मी ठरवलं आता की आपण एक नवं नवं आयुष्य सुरु करायचे ( आपण सगळेच कमी अधीक वेळा असे ठरव तो )आपण चूकलो नाही तरी लोक म्हणतात, म्हणून स्वतःला बदलायचे .....................काय बदल करावा म्हणून मी निवांत वेळी विचार करत बसलो ,काय आणि कस बदलाव फार मोठा विचित्र प्रश्न .......एक पटकन जाणवलं ,एकाला जो बदल हवा आहे तो दुसऱ्याला नक्कीच नको होता . मी कस बदलाव या साठी प्रत्येकाचा अट्टाहास वेगळा होता , आणि त्याचे भांडवल करत होता .माझी मात्र अवस्था खेळातील चेंडू सारखी , तो महत्वाचा तर आहेच पण प्रत्येकजण त्याला टोलवत आहेत आपल्या ताकदी प्रमाणे आणि इतर त्या टोलवा टोलावीचा मनमुराद आनंद घेता घेता मी कस असाव याच्या ही टिप्स देतात न मागता .मला कोणाच्या टिप्स नकोत असा प्रश्न कधी नव्हताच पण त्या टिप्स कमी आणि टोचणी जास्त वाटायला लागल्या ..........
मग काय ........एका निवांत जागी मला माझाच साक्षात्कार झाला . समोर असणाऱ्या खोल दरीवर माझा विश्वास बसला ......................इतकी खोली मला का नाही ? असा प्रश्न मला पडला .उत्तर शोधता शोधता मी दरीचा तळ गाठला ,विचार केला .....एकदम वरून उडी मारली तर ? मी आणि माझे प्रश्न अनुत्तरीतच राहतील . दरी उतरताना त्रास होतोय पण किमान मला माझे अस्तित्व तरी जाणवतय . मग काय ...मानाने पक्का विचार केला , आपल्या सभोवतालचा परिसर फक्त एकट्याच्या प्रश्नांसाठी स्वच्छ केला , आठवणींची रोपे लावून भूतकाळाची बाग फुलवायची ........आणि लगेचच, रम्य स्वप्नांच्या वेलीवर सुखद क्षणांची झटकन फुलेच बहरली .
पहिले पहिले ते सगळे आठवले , रम्य , आनंदी , रमणारे , हसवणारे आणि अलगद डोळ्यात पाणी आणणारे ते सगळे ....आठवणींच्या रोपांवर उमललेली ती फुलेच . एखादे दुखः सुद्धा सुंदर फुलत आणि ते फुलवण्यात ही प्रचंड आनंद असतो .( काहींना ते रडगाणे वाटते .....तर काहींना त्याची कीव येते ) खरच वाटत , ते पण माझेच आहे ना स्वतःच .आता माझ काय ? विचार केला . जस दुखः माझ तस त्या वेदनेवर उमलणार सुख ही माझेच की............................पण एक मजा सांगू ज्यांनी ज्यांनी ह्या उमलणाऱ्या सुखाची जाणीव करून दिली . त्या त्या माझ्या माणसांनी त्या क्षणीक सुखाच्या बदल्यात प्रचंड वेदना न मागताच फुकट दिल्या .काहींनी त्याला सामंजस्य ,तडजोड तर काहींनी नाईलाज व नशीब अशी गोंडस विशेषणे लावली . प्रत्येक विशेषणांच्या सबबीखाली त्यांनी स्वतःची कठीण प्रसंगातून सुटका करून घेतली . आणि मला सावरण्यासाठी ह्या शब्दांची शिदोरी माझ्या पुढे प्रवासासाठी दिली .
जीवन ही काही सहज मिळणारी गोष्ट नाही .जे मिळाले त्यात धन्यता मानवी तर ते जीवन असून ही त्याला अर्थ नाही . जे नाही मिळाले त्या साठी जीवनभर प्रयत्न करावे तर त्याला ही अर्थ उरत नाही .
जे जगता आले पाहिजे आत्ताचे आता .....ते सजवता आले पाहिजे माझ्या कल्पने प्रमाणे , ते विसावता आले पाहिजे दुसऱ्या साठी आणि ते टिकवता आले पाहिजे मी आज पर्यंत जगलेल्या आनंदी क्षणांना सांभाळण्यासाठी ...................................................................
अद्वैत
vedana hi nehami na magatach milte farak asto fakt tichyakade baghnyacha. jeevanatala prateyak kshan, ghatana ha ek abhas asto pan mahanun koni jagane nahi sodat na? je swataja sutaka kaun ghetat tyanchi tari sutaka zaleli aste ka ha hi ek prashnach ahe. pan kahi kshanansathi tari te thodi swapna dakhavatat ani ti apan baghayachi ani nave ayushya suru karayache karan sutaka karun ghenaryat apan swatahahi asto ho na?
ReplyDeleteI sincerely agree with you Advait... I feel its very difficult to carry the burden of expectations from everyone around us, but thats what you call as life. We sometimes forget to live life for ourselves in these multitude. Sacrifices come along with it naturally. It is entirely up to you to decide it...
ReplyDeleteits true yaar .thanks to reply it . its one kind of help to enjoy and reform life with our friends idea and thought.
ReplyDeleteadvait
hy joog madam . its true we also part of such kind of people......but there is defiantly some different of given pain to other.
ReplyDelete