मला आज बुद्धपौर्णिमा असल्या सारखे वाटले , मी खूप घाबरत होतो ब्लोग तयार करायला .......मित्रा रोहित धन्यवाद ..... आज माझा बुद्ध झाला ......मला हे ज्ञान प्राप्त झाले ,
मोकळे होण्याचा एक आधुनिक मार्ग सापडला .खर तर या धावपळीत मी काय आणि माझे मित्र काय सगळेच मन मोकळे करायला विसरलो , वय वाढले तसे गप्पा मारायला आणि भटकायला विसरलोच आहे .एकट राहणे हा सन्मान वातोय का ? हेच कळत नाही . यार मला वेळ नाही , खूप काम असते रे , जाम ताण असतो , स्थिर व्हयाचे आहे , खूप व्याप आहेत . हे ऐकले की वाटते आपण काहीच का करत नाही .
मागील वर्षी आमचा एक मित्र गेला ,,,,,आज ही तो आठवला की डोळे पाणवता .......एकच वाईट वाटते , अभिजित जाताना कोणाशी बोललाच नाही .....तो आजारी पडला , आणि गेला ......बालपण आठवले की तो आठवतो .....पण उमेदीत मात्र नाही तो सोबत .
आपण सगळेच खूप व्यस्थ आहोत ....पण तरी संप्रेषण असणे गरजेचे वाटते .........बोलणे हाच मोठा आधार आहे . असे मला तर वाटते ..............................तुम्हाला ?
VERY TRUE.....
ReplyDelete