आठवणी ...............
मधेच का ग नियतीच नख लागावा ......
तू आहेस अस भासताना ..
तू का ग डोळ्यासमोर नसाव..
वाटा शोधताना ,का ग धुळीच वादळ व्हाव ..
अलगद डोळ्याची पापणी उघडताच ...
का ग आभाळ भरून यावं ..,
मन कोसळत असताना , का ग आवाज होत नाही ...
ओघळणाऱ्या आसवांच रहस्य तरी का ग ...?
आज ही तूला उलगडत नाही ....
क्षणा क्षणाला का ग मी आठवणीत जागाव ....
आणि तू मात्र , का ग आठवणीच सरण रचाव ..
चल सरणावरती का होईना ,तू त्या आठवणी ठेवाशील ना ?
माझ्या म्हणून तरी त्या शेवटी तू जाळशील ना ..........?
अद्वैत
No comments:
Post a Comment