मी १० वी पास झालो , आणि महाविद्यालयातील जीवनाची सुरवात झाली . खरतर कॉलेज म्हणजे काय हे मला कळत नव्हते , निकाल लागला आणि आता काय.? हा प्रश्न समोर , मला स .प महाविद्यालय हे एकाच कॉलेज माहित होते , प्रवेश कसा होणार ? मी जाऊन अर्ज केला ,आणि माल प्रवेश मिळाला.( यात खूप फेऱ्या झाल्या ते आलेच ) . आता काय ? एका नवीन जीवनाची सुरवात .
पहिला दिवस .........कोणीच विसरत नाही ,तसा मी ही नाही ..मी पायात स्लीपर , शर्ट ,प्यांट आणि हातात कॅरीबग ....वाळका देह घेऊन मी कॉलेज मध्ये गेलो . काय करावे ते सुचेना. कुठे जावे ? मग एका मुलाला विचारले ११वी चा वर्ग कोठे आहे , त्याने हाताने दिशा दाखवली , मी त्या दिशेने चालत गेट मधून आत गेलो , तेवढ्यात मला एका मोठ्या माणसाने हाक मारली . ये कुठे चाललास ? मी म्हणालो ११ वी च्या वर्गात आर्ट्स ला .ते माझ्या कडे पाहून हलकेच हसले , माझ्या हाताला धरून त्यांनी मला गेट बाहेर काढले ,आणि म्हणाले हे लेडीज होस्टेल आहे , कॉलेज हे समोर आहे ,आणि ते निघाले .मी त्यांच्या मागे निघालो ....ते कॉलेज च्या मेन इमारतीत गेले . मी ही गेलो . मग मला कळले ते साने सर स .प महाविद्यालयाचे प्राचार्य ....पहिल्या दिवशी मला एका योग्य व मोठ्या माणसाने मार्ग दाखवला .
त्या नंतर खूप आनंद घेतला मी कॉलेज जीवनाचा .पण पहिला दिवस तो पहिला .
I also remembered mine! It was same, only I was sent t a wrong class. These r d golden, immemorable moments that teach u so much 4 ur future. U should preserve it for a lifetime......because they're really unforgettable
ReplyDeletethanks to reply
ReplyDelete