Thursday, 24 October 2013

Maitri...............................

सध्या सध्या गोष्टीतून आणि घटनांमधून आपण माणस जोडत जातो . त्या घटना कालांतराने कालबाह्य ठरतात पण त्यामुळे जोडलेली माणस मात्र चिरकाळ आपल्या हृदयात घर करून बसतात . ……सहज एखादा माणूस प्रवासात भेटतो आणि काही वेळा कायमचा आपला सहप्रवासी होतो हे काळातही नही .
   अनेक प्रवृत्तींच्या लोकांना एकत्र बांधणारा एक समान धागा असतो .कुटुंबात नाती तर समाजात मैत्री .  मैत्री   कोणताही लोभ ,अपेक्षा आणि जबाबदारी यांच्या शिवाय जगण्यातील केवळ निखळ आनंद मिळवून देणारे हे नाते . सुख आणि दु:ख दोन्ही प्रसंगात या नात्याची तीव्रता सारखीच . आपलेपणा ,प्रेम आणि सहवास यांचा सहज सुंदर मिलाफ असणारे हे नाते.
      या नात्याची गुंफण कधी होते ? …………………  जसा उमलणाऱ्या फुलाकडे एकटक पाहत राहिले तरी काळात नाही ते नेमके कधी फुलले ,तसच काहीस या नात्याचे . या नात्याच्या बंधनात आखीव रेखीव अस काहीच नसल तरी फक्त आनंदाची न दिसणारी चौकात मात्र असतेच .
      सतत आसपास असणारी आपली माणस (नातेवाईक ) किती तरी वेळा आपली वाटत नाहीत कडू गोड प्रसंगात त्या त्या नात्यात अंतर वाढत तरी किंवा कमी तरी होत पण शेकडो मैल दूर असो की अगदी जवळ असो मैत्रीच्या नात्यात काहीच  फरक पडत नाही ,असा माझा अनुभव आहे .
     प्रत्येक नात्यात असतात तसे रुसवे फुगवे याही नात्यात असतात पण त्याला न गर्वाची न द्वेषाची ना इतर कोणत्या षढ रीपुंची जोड  असते ,  असतो तो  केवळ  मित्रावरील प्रेमाचा हक्क . तू माझ्यासाठी हे कर मग मी तुझ्यासाठी हे करीन अशा व्यवहारिक बंधनात राहून तर हे नाते कधीच निर्माण करता येणे शक्य नाही ,एखादा छोटासा जरी स्वार्थ निर्माण झाला तरी कोणत्याही नात्याला तडा जातोच पण मित्रानो मैत्रीला तडा जाऊच शकत नाही कारण जेथे तडा गेला तेथे मैत्री कधीच अस्तित्वात नव्हती हे लक्षात घ्याव .
    मैत्रीला कोणतीच सीमा नाही , न वयाच ,काळ ना सामाजिकता न लिंगाचे कसलेच बंधन नाही ख़ऱ्या अर्थाने ते केवळ दोन किंवा अधिक माणसनामधल नात असत. भेद  आला की हे नात  तिथ कधी नव्हतच हे  समाजाव .
मित्र किती असावेत ……क़हि मर्यादा नाही ,कोन असावेत यालाही मर्यादा नाही ,मित्र आपल्याला निवडता येत नाही तो आपसूकच आपल्या जीवनात येतो . माझ्या १०वी च्या वर्गात ५० मुले होती आज त्यातील अगदी थोडे माझ्या सोबत आहेत आणि बाकीच्यांची नावे सुद्धा आठवत नाही .  जे आहेत ते माझ्या मैत्रीच्या धाग्यात .  एका वेळी अनेक क्षेत्रत आपली मैत्री असू शकते आणि ती तितकीच घट्ट हि असते , शाळेतले मित्र , मैदानावरील मित्र ,शेजारी तर काही सामाजिक कामातील केवळ याच नात्याची व्याप्ती विशाल आहे. माणस सहज कमावता येतात , सांभाळता येतात आणि जगता  येतात .
       तरी जर  कोणी एखादा भेटला आणि म्हणाला मला मित्र नाही …………… तर त्याक्षणी मनाची घालमेल होते  की अरे आज ही एक मनुष्यप्राणी तर ……………………………….
                                                                                          अद्वैत

Saturday, 26 January 2013




आठवणी ...............

हळुवार गोंजाराव अस वाटत असतानाच ...
मधेच का ग नियतीच नख लागावा ......
तू आहेस अस भासताना ..
तू का ग डोळ्यासमोर नसाव..
                 वाटा शोधताना ,का ग धुळीच वादळ व्हाव ..
                 अलगद डोळ्याची पापणी उघडताच ...
                 का ग आभाळ भरून यावं ..,
 मन कोसळत असताना , का ग आवाज होत नाही ...
ओघळणाऱ्या  आसवांच रहस्य तरी का ग ...?
आज ही तूला उलगडत नाही ....
                 क्षणा क्षणाला का ग मी आठवणीत जागाव ....
                 आणि तू मात्र , का ग आठवणीच सरण  रचाव ..
चल सरणावरती का होईना ,तू  त्या आठवणी ठेवाशील ना ?
माझ्या म्हणून तरी त्या शेवटी तू जाळशील  ना ..........?
                                                       अद्वैत 


Tuesday, 31 May 2011

ase kahi thrvave ka ?

मी ठरवलं आता की आपण एक नवं नवं आयुष्य सुरु करायचे ( आपण सगळेच कमी अधीक वेळा असे ठरव तो )आपण चूकलो  नाही तरी लोक म्हणतात, म्हणून स्वतःला बदलायचे .....................काय  बदल करावा म्हणून मी निवांत वेळी विचार करत बसलो ,काय आणि कस बदलाव फार मोठा विचित्र प्रश्न .......एक पटकन जाणवलं ,एकाला जो बदल हवा आहे तो दुसऱ्याला नक्कीच नको होता . मी कस बदलाव या साठी प्रत्येकाचा अट्टाहास वेगळा होता , आणि त्याचे भांडवल करत होता .माझी मात्र अवस्था खेळातील  चेंडू सारखी , तो महत्वाचा तर आहेच पण प्रत्येकजण त्याला टोलवत आहेत आपल्या ताकदी प्रमाणे आणि इतर त्या टोलवा टोलावीचा मनमुराद आनंद घेता घेता मी कस असाव याच्या ही टिप्स देतात न मागता .मला कोणाच्या टिप्स नकोत असा प्रश्न कधी नव्हताच पण त्या टिप्स कमी आणि टोचणी जास्त वाटायला लागल्या .......... 
                       मग काय ........एका निवांत जागी मला माझाच साक्षात्कार झाला . समोर असणाऱ्या खोल दरीवर माझा विश्वास बसला  ......................इतकी खोली मला का नाही ? असा प्रश्न मला पडला .उत्तर शोधता शोधता मी दरीचा तळ गाठला ,विचार केला .....एकदम वरून उडी मारली तर ? मी आणि माझे प्रश्न अनुत्तरीतच राहतील .  दरी उतरताना त्रास होतोय पण किमान मला माझे अस्तित्व तरी जाणवतय . मग काय ...मानाने पक्का विचार केला , आपल्या सभोवतालचा परिसर फक्त एकट्याच्या प्रश्नांसाठी स्वच्छ केला , आठवणींची रोपे लावून भूतकाळाची बाग फुलवायची ........आणि लगेचच,  रम्य स्वप्नांच्या वेलीवर सुखद क्षणांची झटकन फुलेच बहरली .
       पहिले पहिले ते सगळे आठवले , रम्य , आनंदी , रमणारे , हसवणारे  आणि अलगद डोळ्यात पाणी आणणारे ते सगळे ....आठवणींच्या रोपांवर उमललेली ती फुलेच . एखादे दुखः सुद्धा सुंदर फुलत  आणि ते फुलवण्यात ही प्रचंड आनंद असतो .( काहींना ते रडगाणे वाटते .....तर काहींना त्याची कीव येते ) खरच वाटत , ते पण माझेच आहे ना स्वतःच .आता माझ काय ? विचार केला . जस दुखः माझ तस त्या वेदनेवर उमलणार सुख ही माझेच की............................पण एक मजा सांगू ज्यांनी ज्यांनी ह्या उमलणाऱ्या सुखाची जाणीव करून दिली . त्या त्या माझ्या माणसांनी त्या क्षणीक सुखाच्या बदल्यात प्रचंड वेदना न मागताच फुकट दिल्या .काहींनी त्याला सामंजस्य ,तडजोड तर काहींनी नाईलाज व नशीब अशी गोंडस विशेषणे लावली . प्रत्येक विशेषणांच्या सबबीखाली त्यांनी स्वतःची  कठीण प्रसंगातून सुटका करून घेतली . आणि मला सावरण्यासाठी ह्या शब्दांची शिदोरी माझ्या पुढे प्रवासासाठी दिली .
                  जीवन ही काही सहज मिळणारी गोष्ट नाही .जे मिळाले त्यात धन्यता मानवी तर ते जीवन असून ही त्याला अर्थ नाही . जे नाही मिळाले त्या साठी जीवनभर प्रयत्न करावे तर त्याला ही अर्थ उरत नाही .
                   जे जगता आले पाहिजे आत्ताचे आता .....ते सजवता आले पाहिजे माझ्या कल्पने प्रमाणे , ते विसावता  आले पाहिजे दुसऱ्या साठी आणि ते टिकवता आले पाहिजे मी आज पर्यंत जगलेल्या आनंदी क्षणांना सांभाळण्यासाठी ...................................................................
                                                                                          अद्वैत 

Saturday, 21 May 2011

college jivanatil maza pahila divas

मी १० वी पास झालो , आणि महाविद्यालयातील जीवनाची सुरवात झाली . खरतर कॉलेज म्हणजे काय हे मला कळत  नव्हते , निकाल लागला आणि आता काय.? हा प्रश्न समोर , मला स .प महाविद्यालय हे एकाच कॉलेज माहित होते , प्रवेश कसा होणार ?  मी जाऊन अर्ज केला ,आणि माल प्रवेश मिळाला.( यात खूप फेऱ्या झाल्या ते आलेच ) . आता काय ? एका नवीन जीवनाची सुरवात .
      पहिला दिवस .........कोणीच विसरत नाही ,तसा मी ही नाही ..मी पायात स्लीपर , शर्ट ,प्यांट आणि हातात कॅरीबग ....वाळका देह घेऊन मी कॉलेज मध्ये गेलो . काय करावे ते सुचेना. कुठे जावे ? मग एका मुलाला विचारले ११वी चा वर्ग कोठे आहे , त्याने हाताने दिशा दाखवली , मी त्या दिशेने चालत गेट मधून आत गेलो , तेवढ्यात मला एका मोठ्या माणसाने हाक मारली . ये कुठे चाललास ? मी म्हणालो ११ वी च्या वर्गात आर्ट्स ला .ते माझ्या कडे पाहून हलकेच हसले , माझ्या हाताला धरून त्यांनी मला गेट बाहेर काढले ,आणि म्हणाले हे लेडीज होस्टेल आहे , कॉलेज हे समोर आहे ,आणि ते निघाले .मी त्यांच्या मागे निघालो ....ते कॉलेज च्या मेन इमारतीत गेले . मी ही गेलो . मग मला कळले ते साने सर स .प महाविद्यालयाचे प्राचार्य ....पहिल्या दिवशी मला एका योग्य व मोठ्या माणसाने मार्ग दाखवला .
       त्या नंतर खूप आनंद घेतला मी कॉलेज जीवनाचा .पण पहिला दिवस तो पहिला .



Thursday, 19 May 2011

मला आज  बुद्धपौर्णिमा असल्या सारखे वाटले , मी खूप घाबरत होतो ब्लोग तयार करायला .......मित्रा रोहित धन्यवाद ..... आज माझा बुद्ध झाला ......मला हे ज्ञान प्राप्त झाले ,
मोकळे होण्याचा एक आधुनिक मार्ग सापडला .खर तर या धावपळीत मी काय आणि माझे मित्र काय सगळेच  मन मोकळे करायला विसरलो , वय वाढले तसे गप्पा मारायला आणि भटकायला  विसरलोच आहे .एकट राहणे हा सन्मान वातोय का ? हेच कळत नाही . यार मला वेळ नाही , खूप काम असते रे , जाम ताण असतो , स्थिर व्हयाचे आहे , खूप व्याप आहेत . हे ऐकले की वाटते आपण काहीच का करत नाही . 
मागील वर्षी आमचा एक मित्र गेला ,,,,,आज ही तो आठवला की डोळे पाणवता .......एकच वाईट वाटते , अभिजित जाताना कोणाशी बोललाच नाही .....तो आजारी पडला , आणि गेला ......बालपण आठवले की तो आठवतो .....पण उमेदीत मात्र नाही तो सोबत .
      आपण सगळेच खूप व्यस्थ आहोत ....पण तरी  संप्रेषण असणे गरजेचे वाटते  .........बोलणे हाच मोठा आधार आहे . असे मला तर वाटते ..............................तुम्हाला ?